
वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी महोत्सव लक्षवेधी ठरणार! नामवंत बैल, रेडा, म्हैस महोत्सवाचे असणार आकर्षण
* *चिपळूण:* वाशिष्ठी डेअरीच्यावतीने शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर आयोजित कृषी महोत्सव लक्षवेधी ठरणार आहे. या महोत्सवात पशुधन आकर्षण ठरणार असून खिल्लार बैल राजा, वाशिष्ठीचा राजा सोना रेडा, गजेंद्र रेडा, पंढरपुरी म्हैस, हिंदकेसरी बैल, भारत बैल, बकासुर बैल असे नामवंत पशुधन या कृषी महोत्सवात सहभागी होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव पर्वणीच ठरणार आहे.
या तयारीचा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी आढावा घेतला. गेल्या वर्षी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर यावर्षी देखील दिनांक ५ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान कृषी व पशुधन कृषी महोत्सव २०२५ चिपळूण शहरातील बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदानात आयोजित करण्यात आले आहे.