
रेल्वेतून पडून दोन तरूण जखमी, एकाचा पाय निकामी
दिवा-सावंतवाडी रेल्वेगाडीतून प्रवास करणार्या तरूणाचा तोल गेल्याने पाय निकामी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विन्हेरेनजिक घडली. दुसर्या घटनेत तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणारा ओंकार राऊत (२४, रा. देवगड) याचा तोल जावून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाला.
राकेश मोरे (रा. तळे-काळकाईवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या दिवा ट्रेनमधून प्रवास करणार्या तरूणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी तातडीने महाड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तो दिवा-सावंतवाडी गाडीने मुंबई येथून तळे येथे येत होता. विन्हेरेनजिक अचानक त्याचा तोल गेल्याने खाली पडला. ही बाब गस्त घालणार्या रेल्वे कर्मचार्यांच्या निदर्शनास आल्यानंतर स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले.www.konkantoday.com