
रिफायनरीसाठी आता जनतेच निर्णय घ्यावा, खासदार सुनील तटकरे.
राजापुरातील प्रस्तावित बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पामुळे महाराष्ट्राला फायदा होवू शकतो. हा प्रकल्प महाराष्ट्रात इतरत्र काठेही होवू शकत नाही. कारण हा मोठा प्रकल्प कोकणातच होवू शकतो. त्यामुळे इथल्या जनतेने हा प्रकल्प होण्यासाठी येथील रोजगाराच्या दृष्टीने निर्णय घ्यावा, असे मत खासदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील दिशा समितीच्या बैठकीनंतर खासदार तटकरे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.www.konkantoday.com