
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगद्यात २४ तास वीजपुरवठ्यासाठी प्रस्ताव.
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने खुली करण्याच्या दृष्टीने प्रलंबित कामांनी वेग घेतला आहे. बोगद्यात २४ तास वीजपुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११०० के. व्ही. वीज देण्याचा प्रस्ताव महावितरणकडे पाठवला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहनचालकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कशेडी बोगद्यातील वाहतूक चर्चेचा विषय ठरली आहे. सद्यस्थितीत एका बोगद्यातून वाहतूक सुरू असून दुसर्या बोगद्यातील विद्युतीकरणासह पुलावर स्लॅब टाकण्यासाठी बोगद्यात पंखे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एका बोगद्यातून दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू असून अपुर्या वीजपुरवठ्यामुळे बोगद्यात बर्याचवेळा अंधार निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बोगद्यात विद्युतीकरणाचे काम सुरू असले तरी दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे वाहनचालकांना वाहने हाकताना कमालीची सावधानता बाळगावी लागत आहे. बोगद्यातून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.www.konkantoday.com