
महावितरणचे सरकारी कार्यालयात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम प्रगतीपथावर.
महावितरणने शासकीय कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम हाती घेतली असून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ५६९ स्मार्ट मीटर बसवून झाले आहेत.महावितरणच्या सूत्रांनी सांगितले की, स्मार्ट मीटर वीज वितरण व्यवस्थेसाठी त्याचबरोबर शासकीय ग्राहकांना देण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वितरण व्यवस्थेमध्ये ३३० फिडर असून त्यापैकी २५४ ठिकाणी आतापर्यंत स्मार्ट मीटर बसवून झाले आहेत.
शासकीय ग्राहकांची संख्या १६ हजार १९५ एवढी आहे. त्यापैकी ४५५२ एवढे मीटर स्मार्ट मीटर स्वरूपात बसवण्यात आले आहेत. महावितरणने डीटीसी मीटर बदलण्यासाठी पावले उचलली. एकूण ८ हजार ८६३ मीटर स्मार्ट स्वरूपात बसवण्यात आले आहे. अशी आकडेवारी गेल्या आठवड्यात कामकाजाचा अहवाल म्हणून सादर करण्यात आली. महावितरणच्या धोरणाप्रमाणे सर्व शासकीय त्याचबरोबर वितरण व्यवस्थेतील सर्व मीटर ह स्मार्ट स्वरूपात बसवण्याचे ठरवण्यात आले आहे. हे काम प्रगतीपथावर आहे.www.konkantoday.com