
दापोली कर्दे किनाऱ्यावर एकाची आत्महत्या
दापोली :- दापोली तालुक्यातील कर्दे साकळेवाडी येथे नरेश सुरेश भुवड वय 33 या प्रौढाने गुरूवार दिनांक तीन रात्री सव्वा दहा ते शुक्रवार दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी पावणे सहा चे दरम्यान घराच्या छताला असलेल्या लोखंडी चॅनलला पंचाच्या सहाय्याने लटकून गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती रमेश भुवड यांनी दापोली पोलीस स्थानक येथे दिली त्यानुसार पंचनामा करून घटनेची नोंद करण्यात आली आहे.