चिपळूण शहरात पाचशे भटक्या श्वानांचे होणार निर्बिजीकरण.
चिपळूण शहरात दिवसेंदिवस वाढणारी भटक्या श्वानांची संख्या, त्यांच्याकडून लहान बालकांवर होणारे हल्ले आणि नागरिकांमधून होणारी ओरड यावर उपाय म्हणून चिपळूण नगर पालिका प्रशासनाने तिसर्यांदा खबरदारी घेतली आहे. आतापर्यंत एक हजार श्वानांची नसबंदी केल्यानंतर आता आणखी पाचशे श्वानांच्या निर्बिजीकरणासह रेबिज लस देण्यासा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी चौथ्यांदा पेटस फोर्स संस्थेची एकमेव निविदा आल्याने या संस्थेला कामाचा आदेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या कामासाठी दहा लाख रूपयांचा खर्च येणार आहे.चिपळुणात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या श्वानांच्या झुंडी सध्या शहरात मोकाटपणे फिरत असून महिला, लहान मुले व विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेने दोनवेळा शहरात भटक्या श्वानांची नसबंदी करून रेबिज लस दिली होती. आतापर्यंत एक हजार श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी वीस लाखांचा निधी पालिका प्रशासनाने खर्च केला आहे. तरीही या भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्याने नगर पालिकेसमोर नवा पेच निर्माण झाला होता.www.konkantoday.com