कोकण रेल्वे मार्गावर सात वर्षांपूर्वी सुरू झालेला डबलडेकरचा प्रवास आता थांबणार

कोकण मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी साल 2015 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकमान्य टिळक टर्मिनसहून (एलटीटी) ते मडगावसाठी सुरू केलेली वातानुकूलित डबलडेकर एक्स्प्रेस सेवा बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.एलटीटीहून ही गाडी स. 5.30 वाजता सुटत असल्याने प्रवाशांना या अडगळीच्या स्थानकावर पोहचण्यासाठी टॅक्सी करावी लागते. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रहिवाशांसाठी एलटीटी येथे पहाटे पोहोचणे अवघड ठरते. तेजस एक्स्प्रेस सीएसएमटीहून स. 5 वा. आणि जनशताब्दी एक्स्प्रेस स. 5.10 वाजता सुटते. आडवळणाच्या एलटीटीस जाण्यापेक्षा सीएसएमटी आणि दादरचा पर्याय अधिक सोपा ठरला आसता
www .konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button