
शेतकर्यांना त्रासदायक ठरणारे वानर, माकडांना मारण्याची परवानगी मिळावी, अविनाश काळे यांची मागणी
कोकणातील शेतकर्यांना वानर, माकडांकडून प्रचंड त्रास होत आहे. याबाबत उपोषण केले. मात्र या उपद्रवी माकडांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वानर, माकड यांना उपद्रवी पशू घोषित करावे, तसेच शेतीमध्ये आलेले वानर, माकड मारण्याची परवानगी द्यावी.
शेती संरक्षण बंदुका परवाने शेतकर्यांना मिळावेत यासाठी शेतकरी अविनाश काळे यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदन दिले असता लक्ष घालण्याचे आश्वासन राणे यांनी दिले.www.konkantoday.com