
शिष्यवृत्तीचे परीक्षेचे दिग्गज मार्गदर्शक म. बा. साळवी यांचे वृद्धापकाळाने निधन.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शक म्हणून खूप मोठे योगदान दिलेले दिग्गज शिक्षक मनोहर बाळकृष्ण उर्फ म. बा. साळवी (९१, रत्नागिरी) यांचे मंगळवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.म. बा. साळवी हे शिर्के प्रशाला रत्नागिरी येथे इयत्ता ५ वी ते ७ व च्या वर्गात शिक्षक असत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे मार्गदर्शक म्हणून ते ख्यातनाम होते.
ते निवृत्त होईपर्यंत ५३३ मुलांना त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिष्यवृत्ती मिळाल्याची नोंद आहे. जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या कोट्यवधींच्या शिष्यवृत्ती यादीत किमान एक तृतीयांश विद्यार्थी हे साळवी सरांनी मार्गदर्शन केलेले असत. ते शिर्के हायस्कूलला शिक्षक असले तरी त्यांच्याकडे अन्य शाळांमधील मुले मार्गदर्शनासाठी येत असत.www.konkantoday.com