
वायूगळती अहवाल दाबण्याचा प्रयत्न मनसे हाणून पाडणार, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर
रत्नागिरीत बांगलादेशी नागरिकांचे सुरू असेलेले वास्तव्य, साखरी नाटेत नव्याने होणारी १५३ कोटींची जेटी, रत्नागिरी शहरातील आरक्षित भूखंडांचा मुद्दा व डेव्हलपरकडून थिबा पॅलेस परिसरातील ग्रीन झोनमधील होणारी झाडांची कत्तल या विषयांवर मनसेने दंड थोपटले आहेत. तर जयगड येथील जिंदाल कंपनीच्या वायुगळती प्रकरणाचा अहवालही जिल्हा प्रशासनाकडून २० दिवस होवूनही जाहीर केलेला नाही हे मुद्दे दाबण्याचे प्रशासन स्तरावर प्रयत्न झाल्यास मनसे गंभीर दखल घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.www.konkantoday.com