
बुद्धविहार संघर्ष समितीकडून दिशाभूल
थिबा राजा कालीन बुद्धविहार संघर्ष समितीकडून २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेले मोर्चाचे आयोजन लोकांची दिशाभूल करण्यासाठी आहे. थिबा राजा कालीन बुद्धविहार जागेवर निधी खर्च करण्यासाठी कम्युनिटी सेंटर शब्द वापरण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी बुद्धविहारच बांधण्यात येणार आहे. बुद्धविहाराशी काहीही संबंध नसणारी लोक विरोध करून दिशाभूल करत आहेत, असा आरोप भीम युवा पँथर संघटनेचे अध्यक्ष प्रितम आयरे यांनी केला.
शासकीय विश्रामगृह माळनाका रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयरे बोलत होते. थिबा राजा कालीन बुद्धविहार ट्रस्ट स्थापन करण्यात आल्यानंतर काही लोकांनी ट्रस्टमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ट्रस्टमध्ये त्यांना स्थान न मिळाल्याने विरोधाची भूमिका घेतली जात आहे. विरोध करणार्यांना शासनाकडून चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी हे लोक उपस्थित राहिले नाहीत, आता विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोर्चामध्ये ५ हजार नाही १ लाख लोक जरी आले तरी आम्ही मागे हटणार नाही.www.konkantoday.com




