
मुंबईतील धारावीत रात्रीच्या सुमारास भीषण अपघात.
एका टँकरचा धक्का लागून 6 गाड्या खाडीत पडल्या सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत नाही.धारावी-माहीम जंक्शन येथे पहाटे झालेल्या अपघातात अनेक वाहनांचे नुकसान पहाटेच्या सुमारास धारावी-माहीम जंक्शनवर एका मोठ्या ट्रेलरचे नियंत्रण सुटल्याने टॅक्सी आणि टेम्पोसह अनेक पार्क केलेल्या वाहनांना धडकल्याने मोठा अपघात झाला. या धडकेमुळे एकूण पाच वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून काही रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडल्या आहेत.
सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. साहुनगर पोलिस आणि माहीम वाहतूक पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नुकसानीचा अंदाज घेतला. अपघातस्थळावरून मोठा ट्रेलर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक छोटी क्रेन पाचारण करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे.