बेळगावमधील पर्यटकांची कार तिलारी घाटात शंभर फूट खाली कोसळली.

गोवाहून माघारी परतणाऱ्या बेळगावमधील पर्यटकांची कार तिलारी घाटात शंभर फूट खाली कोसळली. या अपघातात कारमधील तिघांची प्रकृती गंभीर असून, इतर दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.सर्वांवर बेळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातातील जखमींची नावे समजू शकली नाहीत.नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हे पर्यटक गोव्यात गेले होते. दोन दिवस मौजमजा करून झाल्यानंतर त्यांनी बुधवारी परतीचा मार्ग धरला. रात्री एकच्या सुमारास तिलारी घाट चढत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट १०० फूट खाली खालच्या रस्त्यावर कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button