
पुणे येथे झालेल्या पुरूषोत्तम करंडकमध्ये रत्नागिरीचा पार्थ सर्वोत्कृष्ट.
पुणे येथे झालेल्या पुरूषोत्तम करंडक स्पर्धेत रत्नागिरीच्या सुपुत्राने चमकदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेला रत्नागिरीचा सुपुत्र आणि या एकांकिकेतील मुख्य कलाकार पार्थ पराग पाटणे याला सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य या विशेष पुरस्काराने सन्मानिम करण्यात आले.
या कॉलेजने सादर केलेल्या यात्रा एकांकिकेने प्रथम क्रमांक पाटकावला. या संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्रक आणि स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. सध्या या कॉलेजमध्ये पार्थ पराग पाटणे शिक्षण घेत आहेत.
पार्थ पाटणे यांची उत्कृष्ट लेदर क्रिकेटर म्हणूनही ओळख आहे. तसेच राजर्षी करंडक जिल्हास्तरीय खुली एकांकीका स्पर्देत देखील उत्कृष्ट अभिनयाचा मान त्याला मिळालेला आहे. त्याच्या या यशाच्या मागे त्याचे आई, वडील, आजी-आजोबा तसेच कॉलेजमधील शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे पार्थ याने म्हटले आहे.www.konkantoday.com