
परशुराम घाटात धोक्याची माहिती देणारे फलक मात्र कार्यवाही नाही.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर परशुराम घाटात कोसळणार्या संरक्षक भिंती, त्यामुळे चौपदरीकरणात झालेला विस्कळीतपणा, त्यातच वारंवार घडणारे अपघात यामुळे सर्वत्र टीका झाल्यानंतर जागे झालेल्या राष्ट्रीय महामार्ग महाड उपविभागाने आता घाटात सर्वत्र धोक्याची माहिती देणारे फलक उभारले आहेत.
एकीकडे फलकबाजी केली असतानाच दुसरीकडे ठोस उपाययोजनांच्या दृष्टीने कार्यवाही मात्र शून्यच असल्याचे दिसत आहे.यावर्षीच्या पावसाला प्रारंभ झाल्यानंतर परशुराम घाटात संरक्षक भिंतीसह मातीचा भराव वाहून गेल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हा घाट सर्वांच्या दृष्टीने डोकेदुखी बनला, त्यातच संरक्षक भिंती कोसळलेल्या ठिकाणी मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने घाटाचे चौपदरीकरण होवूनही वाहतूक मात्र आजतागायत विस्कळीतच राहिली आहे. परिणामी गेल्या दीड-दोन महिन्यात घाटात अपघातांची संख्याही प्रचंड वाढली आहे.www.konkantoday.com