नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या पुणे-करमाळी स्पेशलची ८ रोजी अखेरची फेरी.

नववर्षाच्या स्वागतासाठी पार्श्‍वभूमीवर पुणे येथून गोव्याला जाणार्‍या प्रवाशांसाठी पुणे-करमाळी साप्ताहिक विशेष गाडीच्या ६ फेर्‍या चालवण्यात आल्या. ८ जानेवारी रोजी स्पेशलची अखेरची फेरी धावणार आहे. ०१४०७/०१४०८ क्रमांकाची पुणे-करमाळी साप्ताहिक पुणे येथून पहाटे ५.१० वा. सुटून त्याच दिवशी रात्री १०.३५ वा. करमाळी येथे पोहचेल.परतीच्या प्रवासात करमाळी येथून रात्री १०.२० वा. सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी १ वाजता पुणे येथे पोहचेल.

या स्पेशलला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम स्थानकात थांबे आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button