
गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यास बिलात एक. रक्कमी १२० रुपयांची सूट
नूतन वर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरक्कमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे.महावितरणकडून कागद वाचवा, पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार ग्रोग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येते.
मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ १२० रुपये एकरक्कमी सवलत मिळणार आहे. गोग्रीन सेवेचा पर्याय निवडणार्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापिल कागदी बिलाऐवजी ई मेलद्वारे वीज बिल पाठविण्यात येते. याशिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट मिळणार आहे.www.konkantoday.com