रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रात आणखी एका पर्यटकाचा बुडून मृत्यू
रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रात स्नानासाठी गेलेल्या पर्यटक शिक्षकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुणे येथून थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आलेल्या प्रतिक प्रकाश सहस्त्रबुद्धे (३१) याचाही समुद्रात बुडून मृत्यू झाला. या दोन दुर्दैवी घटनांमुळे काशीद समुद्रकिनायावर पर्यटनासाठी जाणार्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रतिक हा तीन मित्रांसोबत भाड्याची रीक्षा घेवून काशीद येथे फिरण्यासाठी आला होता. पोहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या प्रतिकला पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडाला. प्रतिक बाहेर आलेला असावा, अस सर्वप्रथम तीन मित्रांना वाटले मात्र एक तासानंतर त्याचा मृतदेह तरंगताना दिसताच मित्रांना धक्का बसला. जीवरक्षक व पोलिसांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले.
www.konkantoday.com