
सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई: श्रद्धा और सबुरी या मालिकेत रत्नागिरीचे प्रसिद्ध अभिनेते मनोज कोल्हटकर यांची प्रमुख भूमिका
होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेतून मनोज कोल्हटकर घराघरात पोहचले. या मालिकेनंतर आता ते सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई: श्रद्धा और सबुरी या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
मेरे साई: श्रद्धा और सबुरी या मालिकेने भावनिक आणि मार्मिक संदेश देऊन आपल्या प्रेक्षकांना वारंवार प्रभावित केले आहे. प्रेक्षक भक्तिभावाने ही मालिका बघतात आणि साईंच्या चमत्कारांच्या दर्शनाने सद्गदीत होतात. साईंची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मालिकेत साईंच्या वेगवेगळ्या कथा सादर करण्यात येतात. अशीच एक नवीन कथा आता सादर होणार आहे, ज्यात प्रसिद्ध अभिनेता मनोज कोल्हटकर प्रमुख भूमिका करणार आहे. या कथानकात तो जी व्यक्तिरेखा साकारणार आहे, त्या रोचक आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे, बळवंत कुलकर्णी त्यांची ही भूमिका पाहण्यास रत्नागिरी करांसह प्रेक्षक उत्सुक आहेत
www.konkantoday.com