
मी आणि उद्धव ठाकरे एकाच नाण्याचा दोन बाजू, मला मारहाण झाल्याची बातमी खोटी- संजय राऊत.
संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्यासमोरच मातोश्रीवर मारहाण झाल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यावरुन संजय राऊत यांनी स्वत: या प्रकाराबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले की अशी कोणतीही बैठक मातोश्रीवर होत नाही.मला मारहाणा झाल्याची बातमी खोटी आहे. माझी बदनामी करण्याचे अनेक फंडे वापरुन झालेत, पण मी त्यांना पुरुन उरणारा आहे. पण काही लोक आता नवीन मोहिम राबवित आहेत, त्यांनी जरुर याचा आनंद घ्यावा कारण, मी आणि उद्धव ठाकरे हे एकाच नाण्याच्या बाजू आहोत.संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, आरएसएसचा आयटी सेल आहे त्याला सध्या काही काम धंदा नाही, त्यांना महाराष्ट्राच सध्या जे अंधारयुग चाललेले आहे त्यावरुन लक्ष विचलित करायचे आहे.
धनंजय मुंडे, वाल्मिक कराड. सोमनाथ सुर्यवंशी यावरुन लक्ष भरकटवण्यासाठी ते या टोळ्यांना पैसे देतात नाही मग ते कधी शिवेसना, कधी संजय राऊत यांना लक्ष्य करतात, पण मी त्यांना पुरुन उरणारा माणूस आहे. त्यांच्या छाताडावरच मी पाय देऊन पुढे जाणार आहे. मी कट्टर शिवसैनिक आहे.तुम्ही माझ्यावर कितीही हल्ले करा, मला तुरुंगात टाकून झाले, माझ्यावर आरोप करुन झाले, बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबविल्या, आता ही नवीन मोहीम राबविणार असाल तर जरुर आनंद घ्या. मी आणि उद्धव ठाकरे एकाच नाण्याचा दोन बाजू आहोत. शिवसेनेची अशी बैठक मातोश्रीवर होत नाही, उद्धव ठाकरे वन टू वन बोलत असतात. मी शिमल्यात होतो त्यामुळे मारहाणीच्या अफवा आहेत.