पाण्याच्या नुतनीकरणाच्या कामामुळे चिपळूण शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा.
गळती लागणार्या जलवाहिन्यांमुळे ठप्प होणारा पाणी पुरवठा मचूळ व खारट पाण्याची नागरिकांमधून होणारी सततची ओरड, अशा समस्यांनी नागरिक त्रस्त असतानाच आता चिपळूण शहरावर पाणीबाणीचे नवे संकट उभे राहिले आहे. शहरात ग्रॅव्हीटी पाणी योजनेचे सुरू झालेले काम, खेंड येथील पाणी साठवण टाकीचे नुतनीकरण आणि कोयना अवजलचा कमी प्रमाणात होणारा उपसा, यामुळे चिपळूण नगर पालिकेमार्फत शहरात सध्या कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.
प्रशासनाने पाणी पुरवठ्याची वेळ वाढवावी, टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चिपळूण नगर पालिकेच्या खेंड येथील पाण्याच्या टाकीचे नुतनीकरणाचे काम दि. २४ डिसेंबरपासून सुरू झाले आहे. यामुळे संपूर्ण बाजारपेठ, वाणीआळी, मुरादपूर, दादरमोहल्ला, खेंड, उक्ताड या परिसरात साठवण टाकीचे काम पूर्ण होईपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.www.konkantoday.com