पराभव पचवायची हिंमत कुणामध्ये नसेल तर.”, संजय राऊत स्पष्टच बोलले.

शिवसेनेत खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करत आहेत. शिवसेना नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना आहे. आम्ही तयार करायचे आणि मग भाजप किंवा इतर पक्षाने घ्यायचे हा गेल्या 50 वर्षाचा ठेकाच आहेयाचा अर्थ शिवसेनेची बस रिकामी होत नाही. पुढल्या दाराने लोक उतरले की मागच्या दारातून लोक चढतात. शिवसेनेची बस भरलेलीच आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.गुरुवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते. शिवसेनेत कोणतीही अस्वस्थता नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचीच लोक अस्वस्थ आहेत.

अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का? आमिषं दाखवली जातात, सत्तेचा धाकही दाखवला जातोय. जे कमजोर हृदयाचे आहेत त्यांच्याविषयी मला बोलायचे नाही. पण अजुनही शिवसेनेत खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करत आहेत, असे राऊत म्हणाले.राजन साळवी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, त्यांच्याशी चर्चा झाली असून पराभवानंतर ते नक्कीच अस्वस्थ आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा अशा प्रकारे पराभव झालेला आहे. त्याची कारणे सर्वांना माहिती आहे. पण ज्यांना वाटते पक्ष सोडल्यामुळे राजकीय आयुष्य बहरून येईल त्यांना, आमच्यासाख्यांना याच पक्षाने भरभरून दिले आहे.

राजकीय जीवनात एखादा पराभव वाट्याला येतो. तो जर पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वत:ला बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक मानू नये.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही असे अनेक जय आणि पराजय पचवले. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आमच्या वाटेला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत. त्यातून आम्ही आजही उभे आहोत. तुम्ही चार-पाच वेळा, आमदार, खासदार मंत्री झालेले नेते, एकापराभवाने खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाण्याचा विचार करता.

ही माणुसकी नाही आणि नितिमत्ताही नाही.राजन साळवी कडवट शिवसैनिक आहेत. तीन-चार वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली. पण हे दिवसही जातील. 2026 पर्यंत केंद्रामधील सरकार राहील की नाही ही शंका माझ्या मनात कायम आहे. मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाही. त्याचक्षणी महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी उलथापालथ होईल, असेही राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button