
दापोली मध्ये अल्पवयीन मुलीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल.
सोशल मीडिया द्वारे ओळख करून दापोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला एका फार्म हाउसमध्ये नेवून तिला शितपेयामधून गुंगीचे औषध देवून तिच्यावर अत्याचार करून तिचे फोटो काढून ते समाज माध्यमावर टाकण्याची धमकी देवून तिच्याशी वारंवार शरिरसंबंध ठेवून तिला मारण्याची धमकी देणाऱ्या एका युवकाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील एका मुलीला ती अल्पवयीन असताना तिच्याशी समाजमाध्यमाद्वारे ओळख करून घेवून चिपळूण येथील संशयित कडवळकर याने मैत्री केली. या मैत्रीमधून तो या मुलीला एप्रिल २०२२ मध्ये चिपळूण येथील एका फार्महाउस वर घेवून गेला व तेथे तिला शीतपेय पिण्यास दिले. ते या मुलीने प्यायले त्यानंतर या मुलीला गरगरू लागले. त्याचा फायदा घेवून त्याने या मुलीशी त्याने शरीरसंबध केले व त्याचे फोटोही काढले. त्यानंतर आरोपी याने या मुलीला हे फोटो समाजमाध्यमावर टाकेन अशी धमकी देवून तिला गुहागर व मुरुड येथील लॉजवर नेवून तिच्याशी अतिप्रसंग केला.
समाजमाध्यमावर ओळख झाली तेव्हा आरोपी याने वेगळेच नाव सांगितले होते. मात्र या मुलीला त्याचे खरे नाव समजताच तिने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला.तेव्हा आरोपी याने त्याच्याशी लग्न कर असा तगादा लावला मात्र या मुलीने त्यासाठी नकार दिल्याने त्याने या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली अखेर या मुलीने दापोली पोलीस ठाण्यात जावून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.