
दापोली तालुक्यात वर्षाला ५ कोटी २० लाख रुपये सिगारेटच्या धुरातून राख
धूम्रपान केल्याने कॅन्सर होतो असे सरकारी पातळ्यांवरून कितीही ओरडून सांगितले, सिगारेटच्या पाकिटांवर कॅन्सरग्रस्तांचे फोटो छापले तरी देखील सिगारेटची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे जागितक धूम्रपान दिनानिमित्त समोर आले आहे. जिल्ह्यातील केवळ दापोली तालुक्यात वर्षाला ५ कोटी २० लाख रुपये सिगारेटच्या धुरातून राख होत असल्याची आकडेवारी १ जानेवारी या जागतिक धूम्रपान विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर समोर आले आहे.तंबाखू सेवनाने तोंडाचा कर्करोग होण्याच्या दाट शक्यतेसह इतर आजारही बळावतात.
याबाबत जनजागृती होत असतानाही देशात २४.३ टक्के पुरूष आणि २.९ टक्के महिला तंबाखूचे सेवन करीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम दिसत असतानाही गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय माणसाच्या जगण्याशी संस्कृतीशी जुळलेल्या तंबाखूला प्रतिबंध करणे सरकारी पातळीवरून शक्य झालेले नाही. तरूणांमध्ये सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे.www.konkantoday.com