
एकवीरा गडावर दर्शनासाठी गेलेल्या भक्तांवर मधमाशांनी हल्ला चढवल्याने एकच खळबळ.
लोणावळ्यातील एकवीरा गडावर दर्शनासाठी गेलेल्या भक्तांवर मधमाशांनी हल्ला चढवल्याने एकच खळबळ उडाली. देवीची पालखी गडावर वाजत – गाजत म काढण्यात आली होती. या मिरवणुकीत महिला आणि लहान मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मात्र काही हुल्लडबाज भक्तांनी लावलेल्या फटाक्यांमुळे काही कळायच्या आत अचानक उठलेल्या मधमाशांनी पालखीतील भाविकांवर हल्ला केला. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.
सर्वजण सैरावैरा पळू लागले.समोर आलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील एकविरा गडावर हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचेचे फटाके लावले. फटाक्यांमुळे मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहचताच मधमाशांनी भविकांनवर हल्लाबोल करत चावा घेतला. यात अनेक भाविकांची पळापळ झाली. मधमाशांनी काही भाविकांना दंश केला. यात लहान मुलांचा देखील समावेश होता. या सर्वांना तातडीने तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.