मुंबईतून नेतृत्व आणून इथं उभं करण्यापेक्षा स्थानिक नेतृत्व मोठी करावी- भास्कर जाधव यांचा कोणाला टोला?

एकेकाळी कोकण हा शिवसेना बालेकिल्ला होता, पण गेल्या विधानसभा निवडणुकीतील शिवसेना उबाठा पक्षाच्या पदरात पडलेले अपयश पाहता कोकणात पक्षाला कार्यपध्दतीत, काही गोष्टीत, वागण्यात, बदल करावा लागेल.आता मुंबईतून येथे नेतृत्व आणून उभे करण्यापेक्षा स्थानिक नेतृत्व पुढे आणावे लागेल. संपर्कप्रमुख देखील स्थानिक स्तरावर निर्माण करायला हवा, जिल्हाप्रमुखाला खास अधिकार द्यावे लागतील, असे मत उबाठाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.विधानसभा निवडणूकीनंतर आमदार भास्कर जाधव मंगळवारी मतदारसंघातील प्रश्नांसदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीसाठी आले होते.

यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत आणि उबाठा शिवसेनेला उभारी देण्याबाबत पुढील संघटनात्मक बांधणी कशाप्रकारे करता येईल याविषयी पत्रकारांशी मत व्यक्त केले. या निवडणुकीत कोकणपट्टीत उबाठा एकमेव आमदार म्हणून आपण निवडून आलो, पण माझ्या पक्षाच्या लोकांना, शिवसैनिकांना शासनदरबारी योग्य न्याय मिळायला हवा. त्यांचे लोकप्रतिनिधी, आमदार,खासदार नाही म्हणून येथे दुर्लक्ष होऊ नये, त्या सर्व जनतेची जबाबदारी माझ्यावर असल्याचे जाधव म्हणाले. उबाठाला संपूर्ण कोकणात आता आधार देणे, त्यांच्या वर अन्याय होत असेल तर पाठीशी खंबीर उभे राहणार आहे.कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उबाठाची झालेली पिछेहाट पाहता उबाठाला कार्यपध्दतीत बदल करावा लागेल.

मी जरी नेता असलो तरी आम्हाला सर्वांना स्वत: काही गोष्टीत वागण्यात, कार्यपध्दतीत बदल करावा लागेल. आम्हाला आता मुंबईतून नेतृत्व आणून इथं उभं करण्यापेक्षा स्थानिक नेतृत्व मोठी करावी लागतील, त्यांना उभे करून काही खास अधिकार द्यावे लागतील. त्यांच्याकडून निकाली अपेक्षा करत असताना नुसती काम करून चालणार नाही. तर त्यांना अधिकार देउन निकाली अपेक्षा करावी लागेल. तेप्रामाणिक प्रयत्न करत असतील आणि त्यातून निकाल मिळाला नाही तर त्यांची ताकद वाढवावी लागेल. जर प्रामाणिक प्रयत्न होत नसतील तर त्यांना समज देऊन बाजूला करावे लागेल. पण त्यांना पुरेपूर संधी द्यावी लागेल, असेही आ. जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button