
BSNL च्या सिमवर फ्री चालतील 300 लाइव्ह TV चॅनल्स! DTH कंपन्यांचं टेन्शन वाढलं!
अलीकडच्या काळात स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे BSNL लाखो यूझर्सचे आवडते नेटवर्क बनले आहे. नवीन यूझर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी एकामागून एक नवीन सर्व्हिस देखील सादर करत आहे. अलीकडेच कंपनीने BiTV सह मोबाईल एंटरटेनमेंटच्या जगात खळबळ माजवली आहे. होय, या विशेष सेवेसह तुम्ही आता तुमच्या फोनवर 300 पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेलचा आनंद घेऊ शकता. चला याविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
सरकारी कंपनीने ही विशेष सेवा सध्या फक्त पुद्दुचेरीमध्ये सुरू केली आहे आणि आता ती लवकरच संपूर्ण देशात सुरू केली जाऊ शकते. खुद्द बीएसएनएलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे. या विशेष सेवेच्या आगमनाने टीव्ही पाहण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. आता तुम्हाला टीव्हीसाठी कोणताही विशेष सेटअप घेण्याची आवश्यकता नाही, तुम्ही BSNL सिमसह तुमच्या डिव्हाइसवरून टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिज फ्री पाहू शकता.DTH कंपन्यांना दिली टक्कर बीएसएनएलने नुकतीच 7 नवीन सर्व्हिस लॉन्च करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी एक फायबर-बेस्ड इंटरनेट टीव्ही आहे. ज्याला अनेक लोक पसंत करत आहेत. या सर्व्हिसनंतर, BSNL ब्रॉडबँड यूझर्स 500 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेलचा फ्री आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर आता BiTVच्या आगमनाने मोबाईल वापरणाऱ्यांचीही मजा झाली आहे. त्याच्या मदतीने, तुम्ही आता थेट तुमच्या डिव्हाइसवर लाइव्ह टीव्हीचा आनंद घेऊ शकता, जे डीटीएच प्रोव्हायडर्सला कठीण टक्कर देईल.
यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमधील Google Play Store वरून BSNL Live TV ॲप डाउनलोड करावे लागेल.- यानंतर तुम्हाला बीएसएनएल सिमकार्डने या ॲपवर लॉग इन करावे लागेल.- आता तुम्ही 300 पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेलचा पूर्णपणे मोफत आनंद घेऊ शकता.- एवढेच नाही तर बीएसएनएलच्या अधिकृत ॲप किंवा वेबसाइटद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर BiTV सर्व्हिस देखील ॲक्सेस करू शकता.