
मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया-शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील.
कॉमेडियन कुणाल कामराच्या एका गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. या गाण्याच्या माध्यमातून त्याने नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती, त्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले.कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील एक गाणं म्हणत कुणाल कामराला प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले शहाजी बापू?‘मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया, उद्धवजी को खुशी आया लेकीन ठाणे का टायगर आखो मे अंगार उबाठा को खत्म करणे महाराष्ट्र के मैदान में आया,’ असं गाणं यावेळी शहाजी बापू यांनी म्हटलं आहे. दरम्यान कुणाल कामराच्या या विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यातील 14 कोटी जनतेचं मन दुखावले आहे, त्यामुळे आपन सांगोला येथे कुणाल कामराच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.