नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर!

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2025 च्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून बँकिंगच्या काही नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम कोट्यवधी नागरिकांवर पडू शकतो. रिझर्व्ह बँकेचा हा नियम बँक खात्यांवर लागू होणार आहे. कोणत्या प्रकारची बँक खाती बंद होणार आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

आरबीआयनं फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी, बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता आणि डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी सायबर गुन्हेगारीचा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. गेल्या 12 महिन्यांपासून ज्या बँक खात्यांमध्ये कसलाच व्यवहार झालेला नाही, ती खाती बंद करण्याचा आरबीआयनं निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळं जी खाती 12 महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद असतील ती बंद होतील.

ज्या बँक खात्यांमध्ये गेल्या 12 महिन्यांपासून किंवा अधिक काळापासून कोणताही व्यवहार झालेला नाही त्यांना इनॲक्टिव्ह कॅटेगरीत टाकलं जाईल. एखाद्या खातेधारकानं एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ कोणताही व्यवहार केला नसेल तर ते खातं इनॲक्टिव्ह कॅटेगरीत टाकलं जाईल. तुम्ही आवश्यकता असल्यास बँकेशी संपर्क करु ॲक्टिव्ह करु शकता. फसवणकीच्या प्रकरणांपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या खात्यांमध्ये दीर्घ काळापासून शिल्लक रक्कम शून्य असेल अशी खाती देखील बंद केली जाणार आहेत. खात्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. ग्राहकांना त्यांच्या खात्याचा वारंवार उपयोग करण्यासाठी देखील प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आलं आहे. तुमच्या खात्यात दीर्घ काळापासून व्यवहार झाला नसल्यास बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन केवायसी करुन घेणं आवश्यक आहे.

ज्या खात्यामध्ये दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी कोणताही व्यवहार झाला नसेल तर ती खाती डॉरमॅट खाती म्हणून ओळखली जातात. ही खाती सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर असतात. त्यांच्याकडून ही खाती हॅक होतात आणि त्याचा वापर लोकांच्या फसवणुकीसाठी केला जातो.दरम्यान, सामान्य नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरुन फोन आल्यास पासवर्ड, पिन अथवा ओटीपी शेअर करु नये. अनोळखी व्यक्ती सोबत तुम्ही तुमच्या बँक खात्याचे तपशील शेअर केल्यास नुकसानीचा सामना कराव लागू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button