
धर्मासाठी घेतलेल्या या खटल्यांचा मला अभिमान -नीतेश राणे
हिंदू राष्ट्राला विकसित करण्यासह राष्ट्र सुरक्षित ठेवणेही तेवढेच आवश्यक आहे.आपली ती जबाबदारी आहे. हिंदुत्वासाठी कार्य करताना माझ्यावर ३८ खटले दाखल आहेत. धर्मासाठी घेतलेल्या या खटल्यांचा मला अभिमान आहे, असे मत्स्य व बंदर विकासमंत्री नीतेश राणे येथे म्हणाले.विद्यार्थी परिषदेचा इतिहास वेगळा आहे. या संघटनेने देशाला नेतृत्व करणारे नेते दिले. त्यामुळे देशाच्या आणि हिंदूंविरोधात असणाऱ्यांच्या आडवे जाणे गरजेचे आहे. तो कडवटपणा आपल्यात असलाच पाहिजे, तरच देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करणार नाही, असेही राणे म्हणाले.