
विधानसभा अध्यक्षांकडे असलेली सर्व मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात दाखल करा – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी कोर्टाने खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमत चाचणीवर अवलंबून राहणे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात नाहीय का? असा प्रश्न विचारला.सर्वोच्च न्यायालयात आता या प्रकऱणी पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, पुढच्या चार आठवड्यात जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे असलेली सर्व मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात दाखल करा असे आदेश सर्वोच्च न्यायालायने दिले आहेत.विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर एकनाथ शिंदे यांच्या वतीने महेश जेठमलानी आणि हरीश साळवे तर अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.www.konkantoday.com