चाचा नेहरु बाल महोत्सव 3 ते 5 जानेवारी रत्नागिरीत
रत्नागिरी,दि. 31 : जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ निराधार उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी हा बाल महोत्सव दि. 3 जानेवारी ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडीयम मारुती मंदिर येथे आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
या महोत्सवात संस्थाबाहय (नगर परिषद शाळांमधील) मुलेही सहभागी होणार आहेत. बाल महोत्सवात क्रिकेट, खोखो, कबडडी, गोळाफेक, लांब उडी, 100 मीटर धावणे, 4 x 100 मीटर रिले, कॅरम, बुध्दीबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, अशा क्रीडा स्पर्धा तसेच सामुहिक नृत्य, सामुहिक गायन, नाटीका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन आदी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.000