टिक टिक, टिक टिक.! नवीन वर्षासाठी गूगल सज्ज; खास डूडल पाहून वाढेल तुमचाही उत्साह!

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. आज अनेक जण मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य, तर प्रियकर प्रेयसीबरोबर फिरायला जाण्याचा, हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा किंवा घरीच (होम पार्टी) करण्याचे ठरवतील आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करतील. अगदी १२ वाजायला १० मिनिटे असतील तेव्हा आपण सगळे काउंटडाऊन सुरू करतो. तर याचनिमित्त आता गूगलसुद्धा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे (New Year’s Eve 2024). गूगल एक नवीन डूडल घेऊन आले आहे. काय आहे या डूडलमध्ये खास चला जाणून घेऊ…

*तुम्हीदेखील तुमच्या स्क्रीनवर गूगल चालू केल्यास आज तुम्हाला गूगलचे रूप बदललेले दिसेल. गूगल एक खास डूडल बनवून, २०२४ ला निरोप देण्यासाठी तयारीत आहे. गूगलने चित्रित केलेल्या डूडलमध्ये एक घड्याळ दाखवले आहे आणि हा काटा हळूहळू १२ या आकड्याजवळ जाऊन पुन्हा मागे जातो आहे, असे दाखवले आहे. अशा प्रकारे नवीन वर्षापूर्वीची संध्याकाळ म्हणजेच ३१ डिसेंबर २०२४ हा दिवस साजरा करण्यासाठी गूगल सज्ज झाले आहे.

तुम्ही पाहिले असेल की, गूगलच्या या डूडलमध्ये एक व्हायब्रन्ट ॲनिमेटेड डिझाइन आहे. Google हा शब्द गडद ठळक अक्षरांत लिहिण्यात आला आहे. मात्र ‘O’च्या जागी एक घड्याळ चित्रित करण्यात आले आहे, जे १२ वाजण्याचे संकेत देत आहे आणि नवीन वर्ष सुरू होण्याचा उत्साह वाढवत आहे. तसेच या डूडलमार्फत “तुम्ही ठरवलेल्या संकल्पांचे नियमित पालन करा. कारण- नवीन वर्ष नवीन संधी घेऊ येत आहे. काउंटडाउन सुरू होऊ द्या”, असा मेसेज सांगणारे हे डूडल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.एखादा सण असो किंवा भारतासाठी, जगासाठी एखादा खास दिवस, गूगल नेहमीच विशेष डूडल घेऊन आपल्या सगळ्यांसमोर येते.

कधी आपल्यासाठी डूडलमार्फत खेळ घेऊन, तर कधी कोणाला वाढदिवसाच्या हटके पद्धतीने शुभेच्छा द्यायला गूगल कधीच मागे राहत नाही. तर आज गूगलने ३१ डिसेंबर हा दिवस खास करण्याचा प्रयत्न केला आहे (New Year’s Eve 2024). आज प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करणार आणि यात भर घालण्यासाठी गूगलनेदेखील वर्षाच्या अखेरीस त्याचे खास डूडल सादर करून, नवीन वर्षासाठी काउंटडाऊन सुरू केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button