शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात
शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली. अपघातावेळी रवींद्र वायकर गाडीत होते, ते सुखरूप आहेत. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या गेट जवळ हा अपघात झाला आहे.उत्तर पश्चिम जिल्ह्याचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला रविवारी रात्री एका खाजगी कार्यक्रमावरून परतत असताना अपघात झाल्याची घटना घडली.
गोरेगाव एस.आर.पी.कॅम्प बिंबिसार कॉलनी जवळ मुख्यमार्गावर गाडी टर्न घेत असताना रवींद्र वायकर यांच्या गाडीच्या डाव्या बाजूला एका दुसऱ्या गाडीने धडक दिली. खासदार रवींद्र वायकर हे सुखरूप असून फक्त गाडीला डाव्या बाजूच्या गाडीचा दरवाजाला ठोकल्यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे.