
शिक्षकांच्या पगारी ५ जानेवारीपर्यंत होणार; सरकारकडून पगारीसाठी मिळाले पैसे
राज्यातील अनुदानित खासगी शाळांसह जिल्हा परिषदांच्या शाळांवरील जवळपास साडेचार लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून अंशदान वितरित करण्यात आले आहेदरमहा पगारासाठी २२ ते २५ तारखेपर्यंत अंशदान वितरित होते, पण यावेळी तिजोरीत पैसा नसल्याने शिक्षकांच्या पगारीसाठी ते दोन दिवस विलंबाने वितरित करावे लागले. त्यामुळे शिक्षकांचा डिसेंबर महिन्याचा पगार आता १ तारखेऐवजी ५ तारखेपर्यंत होईल, असे वेतन अधीक्षकांनी सांगितले.