
जिल्हा उद्योगमधून ५ लाखांचे कर्ज करून देतो, असे सांगून महिलेची ३० हजारांची फसवणूक, दोघांवर गुन्हा.
जिल्हा उद्योगमधून ५ लाखांचे कर्ज करून देतो, असे सांगून एका महिलेची ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंदार गायकवाड याच्यासह एका महिलेवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेली महिला खेड येथील बसस्थानकात असताना संशयितांनी तिच्याशी संगनमत करत जिल्हा उद्योगमधून ५ लाख रुपये कर्ज करुन देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी रोख रुपयांत ३० हजार रुपये स्विकारले. मात्र महिलेस कर्ज न मिळाल्याने अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.www.konkantoday.com