
ऑर्डर दिलेल्या भाकऱ्या वेळेत दिल्या नाही म्हणून हॉटेल मॅनेजरला मारहाण.
हॉटेल मध्ये जेवण करण्या साठी आलेल्या ग्राहकांना वेळेत भाकरीची ऑर्डर न मिळाल्या च्या रागातून ५ जणांच्या समूहाने हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण करत हॉटेलची नासधूस केल्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार २७ रोजी दुपारी १ वा च्या सुमारास महामार्गा वरील खेड निगडे येथील हॉटेल वेदांत येथे घडलाजितेंद्र जयसिंग रसाळ वय-३९ वर्षे, – वेंदात हॉटेल मॅनेजर रा. चिंचवली भटवाडी ता. खेड असे त्या मारहाण झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.
हॉटेल वेदांत येथे गोवा बाजुकडुन चार चाकी ३ वाहने येवुन त्यामधुन ८ महीला व ७ पुरुष असे जेवण करण्यासाठी निगडे येथे वेदांत हॉटेल मध्ये आले व त्यांना फिर्यादी यांनी जेवण टेबल वर दिले होते त्यानंतर ते जेवण करीत असताना त्यानी परत १० भाकरीची ऑर्डर दिली होती परंतु भाकरी शेकण्यासाठी उशिर झाले. त्याचा त्यांना राग येवुन त्या ग्राहकापैकी ५ अनोळखी इसम वय अंदाजे ३५ ते ४५ वर्षे यांनी फिर्यादीशी वाद घालुन फिर्यादी यांना ढकला- बुकल करुन हाताचे थापटाने व लाता- बुक्क्याने मारहान करुन शिविगाळी केली व हॉटेल मधील प्लास्टिकच्या ०२ खुर्च्या व जेवणाचे ट्रे तोडुन फोडुन नुकसान केले सदर मारहाणीमध्ये फिर्यादी यांना मुक्कामार लागला