उत्तरप्रदेशमधील कामगाराची रत्नागिरीतील फर्निचर वर्कशॉपमध्ये गळफास घेत आत्महत्या.
कर्जबाजारी झालेल्या उत्तरप्रदेशमधील कामगाराने रत्नागिरीतील फर्निचर वर्कशॉपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 28 डिसेंबर रोजी रात्री 8 वा.सुमारास उघडकीस आली.महेंद्र सुखाई प्रजापती (33,मुळ रा.रुधौली खुर्द,बस्ती उत्तरप्रदेश सध्या रा.एम.आय.डी.सी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे.याबाबत फर्निचर मालक असरार मुल्ला (रा.उद्यमनगर,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
त्यानुसार, मयत कामगार महेंद्र प्रजापती हा असरार यांच्या मालकीच्या साहिल फर्निचर या एमआयडीसी येथील वर्कशॉपमध्ये त्याच्या पत्नी व लहान मुलासह कामाला होता. महेंद्रने उत्तरप्रदेश येथे समुहामध्ये घेतलेले कर्ज थकित झालेले होते. ते कसे फेडावे या टेन्शनमध्ये त्याने शनिवार 28 डिसेंबर रोजी रात्री 8 वा. सुमारास वर्कशॉपच्या पत्र्याच्या छताच्या लोखंडी पाईपला साडीने गळफास घेत आत्महत्या केली.