
मोठी बातमी! महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजाला अटक
राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजाला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई कऱण्यात आली. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली आहे. बगेश्वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरण महाराजला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात विविध ठिकाणी कालिचरण महाराजा च्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या महाराष्ट्रातही
महात्मा गांधींविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजविरोधात ठाणे शहरात पोलिसात तक्रार दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींसंबंधी वापरण्यात आलेल्या शब्दामुळे मला दुःख झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले. .
www.konkantoday.com