
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेबरोबर युती करणार नाही-आशिष शेलार
राज्यात आघाडी सरकारमधील काही घटक पक्षांनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता भाजपनेही स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत. भाजप नेते, आमदार अॅड. आशिष शेलार यांनीही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं सुतोवाच केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेबरोबर युती करणार नाही, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
www.konksntoday.com