
रत्नागिरी जिल्ह्यात आढळले ९ कुष्ठरुग्ण.
रत्नागिरी जिल्ह्यात १६ ते २० डिसेंबर या कालावधी दरम्यान कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) अंतर्गत आरोग्य विभागाकडून कुष्ठरुग्ण शोध मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. त्यामध्ये केवळ ९ कुष्ठरुग्ण आढळले आहेत.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विवेकानंद बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेतील कामाचे पर्यवेक्षण करणारे आरोग्य विभागाचे सबंधित अधिकारी व पर्यवेक्षक तसेच प्रत्यक्ष रुग्णांचे सर्वेक्षण व तपासणी करणारे आरोग्य कर्मचारी यांनी या मोहिमेत उत्तम काम केले. मोहिमेपुरते मर्यादित न राहता यापुढेही आरोग्य कर्मचारी आपल्या नियमित गृहभेटीत नागरिकांची तपासणी करतील.