
भारतीय जनता पार्टी सभासद नोंदणी अभियानाला प्रभाग क्रमांक ६ मधून जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत जोरदार सुरुवात..
प्रभाग क्रमांक ६ साठी निलेश आखाडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन..
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहरामध्ये सभासद नोंदणी अभियानाला प्रभाग क्रमांक ६ मधुन जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली होती. आणि आता राजेशजी सावंत यांच्या नेतृत्वात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सर्व मंडल स्तरावर बूथ स्तरावर सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. सभासद नोंदणी अभियानाचे प्रमुख म्हणून जिल्हा सरचिटणीस सतेजजी नलावडे हे काम पाहत आहेत.
आज दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता प्रभाग क्रमांक ६ मध्ये अभ्युदय नगर येथून शहर सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक सहा मधील भाजपा कार्यकर्ते निलेश आखाडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक सहा साठी तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे देखील अनावरण करण्यात आले.
शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातली सर्व प्रभागांमध्ये सभासद नोंदणी अभियान राबवले जाणार आहे. रत्नागिरी शहरांमध्ये सभासद नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी सांगितले. सभासद नोंदणी अभियान आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता ताई रूमडे, शोनाली आंबेरकर, राजेंद्र पटवर्धन,संदीप सुर्वे, निलेश आखाडे, प्रविणचंद्र हर्डीकर,भक्ती दळी, सायली बेर्डे, मंदार खंडकर, बाँड सावंत, प्रज्ञा टाकले, प्रवीण रुमडे, आदी उपस्थित होते.