
गणपतीपुळे येथे पर्यटकांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार भाेजन
गणपतीपुळे येथे येणाऱया पर्यटकांना दर्जेदार व स्वच्छ अन्नाची हमी मिळावी यासाठी कोकणातील पहिले क्लीन स्ट्रीट फूड हब गणपतीपुळे येथे सुरू करण्यात येणार आहे भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येणार असून येत्या दोन महिन्यात त्याची अमलबजावणी सुरू होईल यासाठीच्या आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत व स्टॉल धारकांना प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार आहे .
www.konkantoday.com