राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पदक मिळवलेल्या मैत्रेयी मनोज साळवी हिचा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार
भोपाळ येथे सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत लांजा तालुक्यातील पूनस गावच्या कुमारी मैत्रेयी मनोज साळवी हिने राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत कांस्य पदक मिळवल्याबद्दल उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पाली निवासस्थानी शाल व श्रीफळ देऊन तिचा सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.