
रत्नागिरीत मनसेला खिंडार; उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत सहकार्यांसह भाजपात.
मनसेमध्ये अंतर्गत सुरु असलेल्या धूसफुसीला कंटाळून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, उपशहरअध्यक्ष जितेंद्र जाधव यांच्यासह माजी शहराध्यक्ष सतीश राणे यांनी आपल्या सहकार्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. माजी मंत्री व आमदार रविंद्र चव्हाण यांनी या सर्व पदाधिकार्यांचे स्वागत केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर मनसेमध्ये पक्षांतर्गत कुरबुरी वाढली होती. पक्षात काम करणार्यांकडे पदाधिकार्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, उपशहरअध्यक्ष जितेंद्र जाधव, माजी शहराध्यक्ष सतीश राणे यांनी आपल्या सहकार्यांसह भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
रत्नागिरी शहरातील विविध भागातील काम करणार्या मनसेच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. भाजपातील प्रमुख पदाधिकार्यांशी झालेल्या चर्चेनंतर भाजपाच्या सभासद नोदणी अभियान कार्यक्रमात या मनसेच्या पदाधिकार्यांनी प्रवेश केला. आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी, माजी आमदार डॉ. विनय नातू या सर्वांनी या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.