भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती.
भाजपच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा आज केली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती होईपर्यंत चव्हाण यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रदेश अध्यक्षांप्रमाणेच रविंद्र चव्हाण यांच्याकडे अधिकार राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे.