
निजामुद्दीन-तिरूवअनंपूरम आरक्षित एक्सप्रेस धावणार
नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या दिशेने येणार्या पर्यटकांसाठी दक्षिणेतून २८ डिसेंबर रोजी आरक्षित हजरत निजामुद्दीन तिरूवअनंतपुरम एक्सप्रेस धावणार आहे. या एक्सप्रेसमुळे गर्दीची तीव्रता कमी कमी होण्यास मदत होणार आहे. ०४०८२ क्रमांकाची हजरत निजामुद्दीन आरक्षित एक्सप्रेस शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता हजरत निजामुद्दीन येथून सुटून तिसर्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता तिरूवअनंतपुरम येथे पोहचेल.
परतीच्या प्रवासात ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७.५० वा. तिरूवअनंतपुरम येथून सुटून तिसर्या दिवशी सकाळी ६.४५ वा. हजरत निजामुद्दीन येथे पोहचेल. १९ एलएचबी डब्याची स्पेशल वसईमार्गे धावणार आहे. कोकण मार्गावर पनवेल, रोहा, चिपळूण, कणकवली, थिविम, मडगाव, कारवार आदी स्थानकांवर थांबे आहेत.www.konkantoday.com