
रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष स्वबळावर लढणार महायुतीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाने आपली खळबळजनक भूमिका स्पष्ट केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. स्वतंत्र लढूनच पक्षाला बळकटी आणि कार्यकर्त्याला न्याय देता येईल, अशी भूमिका पक्षाचे महाराष्ट्र संघटक व चिपळूणचे सुपुत्र संदेश दयानंद मोहिते यांनी मांडली आहे. दरम्यान आरपीआय पक्षाने येत्या निवडणुकांत वेगळी चूल मांडून लढण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.www.konkantoday.com




