
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुणास शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पारस भिकाजी आडिवरेकर असे संशयित तरुणाचे नाव आहे.अत्याचार झालेल्या पिडीत अल्पवयीन मुलाला त्रास होवू लागल्यानंतर तिची प्रकृती ढासळली त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तिला उपचारासाठी प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी पिडीतेच्या नातेवाईकांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासात पोलिसांनी संशयितास अटक केली. न्यायालयाने १ जानेवारीपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.